Ad will apear here
Next
सुखकर्ता दुःखहर्ता
लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया रचला. आता हा उत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या दैवताला जाणून घेण्यासाठी डॉ. सी. ग. देसाई यांनी सुखकर्ता-दुःखहर्तामधून गणेशोपासकांना उपास्य दैवताची सर्व माहिती पुरवली आहे. श्रीगणपती गजाननाचा वेदकाळापासूनचा उगम व विकास, गणपतीची स्तुती व उपासना सांगणारी उपनिषदे, श्री ब्रह्मणपतिसूक्तमची माहिती आणि सुक्त, श्रीगणपती मालामंत्र, त्याचे मराठी स्तोत्र, गणेश उपनिषदे व गणपती यांचा परिचय यातून देण्यात आला आहे. 

गणपती अथर्वशीर्ष, त्यातील विविध पाठभेद, शांतीपाठ, अथर्वशीर्षाचा गेयानुवाद, त्याचे विवेचन, गणेश यंत्रांची माहिती व गजाननाच्या कथाही सांगितल्या आहेत. श्री मुद्गलपुराणाचा परिचय, गणेश मुर्ती व चतुर्थीच्या निर्मितीचे रहस्य, गजमुखासंबंधी विविध उपपत्ती, उपासनेची साधने, कथा व महत्त्व, मराठी संत व कवींची गणेशस्तवनातील काही वेचे देत गणपती व गणेशपूजेविषयी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायक, परदेशातील गणेशस्थाने, गणेशभक्त यावषयीही माहिती दिली आहे. 

पुस्तक : सुखकर्ता दुःखहर्ता
लेखक : डॉ. सीताराम गणेश देसाई
प्रकाशन : पंचतत्त्व प्रकाशन
पृष्ठे : ३०९
मूल्य : १६२ रुपये

(‘सुखकर्ता दुःखहर्ता’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZWMBX
Similar Posts
अमेरिकेतलं बाळंतपण सध्याच्या युगात जग लहान झालंय. विविध क्षेत्रांतील मोठमोठ्या कंपन्यांच्या नोकरीसाठी बहुसंख्य लोक परदेशी प्रयाण करत आहेत. कालांतराने ते कुटुंबासहित तिकडेच राहतात. पुढे परदेशस्थ झालेल्या लेकी-सुनांच्या बाळंतपणासाठी आईलाही तिकडे जावे लागते. या अशा सगळ्या थोड्या किचकट, पण सुखावणाऱ्या अनुभवातून ‘माधुरी गुर्जर’
अनोखा ‘अरण्यबंध’ चित्रपटांची आवड जोपासण्याच्या निमित्तानं बंगाली कादंबऱ्यांकडे वळलेल्या ठाण्यातील अर्चना पटवर्धन यांना ज्येष्ठ बंगाली लेखक बिभूतीभूषण बंदोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘आरण्यक’ या पुस्तकाने भुरळ पाडली. हे पुस्तक त्यांनी मराठीत अनुवादित करून ‘अरण्यबंध’ नावाने ‘ई-बुक’ स्वरूपात वाचकांसमोर आणलं. बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या ‘ई-बुक’चा हा परिचय
राजनीती आणि राजव्यवहाराचे दिग्दर्शन करणारा चाणक्य आणि त्याचे अर्थशास्त्र ‘सगळे विरोधक जर आपापले मतभेद आणि शत्रुत्व विसरून एक होत असतील, तर त्या देशाचा राजा प्रामाणिक आहे, असे निश्चित समजावे.’ हे वाक्य आज सगळ्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. त्याचा प्रतिपादक आहे आर्य चाणक्य ऊर्फ कौटिल्य. अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर चाणक्याच्या नावाची चर्चा होते; पण प्रत्यक्षात चाणक्याची
लढवय्या.. कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रोत्तर भारतातील पहिले शेतकरी नेते, भातभाव लढ्याचे प्रणेते, इगतपुरीचे लोकनायक आमदार, शेतकरी आणि लोकांच्या हक्कासाठी लढणारा सच्चा आणि लढवय्या नेता, ही कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने यांची खरी ओळख आपल्या ‘लढवय्या.. कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने’ या पुस्तकातून लेखिका सुमनताई गोवर्धने यांनी करून दिली आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language